Mon, Nov 19, 2018 04:33होमपेज › Satara › अत्याचाराने मुलगी गर्भवती : पोक्सोचा गुन्हा

अत्याचाराने मुलगी गर्भवती : पोक्सोचा गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन, वेळोवेळी अत्याचार केल्याने नवनाथ पाटील (रा. सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी शहर परिसरातील असून तिच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित युवक हा मुलीशी फोनवरून बोलत होता. त्यातून संशयिताने ओळख वाढवून मुलीला शाहूपुरीसह ठिकठिकाणी नेऊन अत्याचार केले.

सध्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण आहे. मात्र, मुलगी सध्या सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समोर आल्याने व अत्याचार झाले तेव्हा अल्पवयीन असल्याने मुलीच्या वडिलांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी संशयित नवनाथ पाटील याच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 

 

tags ; Satara,news,girl,pregnant, pokso, crime,in Satara,


  •