Wed, Jul 24, 2019 13:02होमपेज › Satara › सातारा : कळंबीतून तडीपारमधील गुंडाला घरातून अटक

सातारा : कळंबीतून तडीपारमधील गुंडाला घरातून अटक

Published On: May 29 2018 12:58PM | Last Updated: May 29 2018 12:58PMऔंध : वार्ताहर

कळंबी (ता. खटाव) येथील तडीपार संशयित आरोपी मल्हारी विठ्ठल ढोले याला त्याच्या रहाते घरातून मंगळवारी पहाटे अडीच वाजता आँल आऊट आँपरेशनमध्ये औंध पोलीसांनी अटक केली. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणीचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी महावितरणच्या डिपी चोरी प्रकरणात तसेच घरातील दागिने चोरी प्रकरणात मल्हारी ढोले (वय ३०) याच्यावर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे विविध गुन्हे दाखल असल्याने मल्हारी ढोलेसह अन्य दोघांना एक वर्षासाठी तीन तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्रगस्तीमध्ये औंध पोलिसांनी मल्हारी ढोले याच्या घराची तपासणी केली असता तो घरी आढळून आला. मल्हारीच्या तडीपारीच्या कालावधीस अजूनही तीन महिने अवधी असतानाही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याकारवाईमध्ये सपोनि सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, किरण जाधव यांनी सहभाग घेतला.