Wed, Mar 20, 2019 23:26होमपेज › Satara › मृताला जिवंत दाखवून जमीन बळकावली

मृताला जिवंत दाखवून जमीन बळकावली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मृत व्यक्‍ती जिवंत असल्याचे दाखवून चिंचणेर येथील जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सातारा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात याबाबतची खोटी कागदपत्रे तयार करून दाखल केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हणमंत शंकर पानस्कर, संदीप शिवदास मांडवे, हणमंत शंकर शेडगे, यशवंत भानुदास डांगे, चंद्रकांत हणमंत डांगे (सर्व रा. चिंचणेर निंब, निगडी, ता. सातारा) यांच्याविरुद्ध आपापसात संगनमत करून फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कार्तिक मानसिंग पाटील (मूळ रा. बोरगाव, ता. वाळवा, सांगली) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार कार्तिक पाटील यांच्या वडिलांच्या नावे चिंचणेर निंब येथे शेतजमीन होती व ती वाट्याने करण्यासाठी दिली होती. गेल्या काही वर्षांपूर्वी तक्रारदार कार्तिक पाटील यांच्या वडिलांचा  मृत्यू झाला. त्यानंतर काही महिन्यांनी चिंचणेर निंब येथे असणारी जमीन अन्य काही जणांनी बळकावली असल्याची माहिती तक्रारदार कार्तिक पाटील यांना समजली. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रे बाहेर काढल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

वडिलांचा मृत्यू झाला असतानाही संशयितांनी शेतजमीन बळकवण्यासाठी वडिलांच्या नावावर त्रयस्थ व्यक्‍ती उभी करुन सातारा निबंधक कार्यालयात खोटी कागदपत्रे तयार करुन जमीन बळकावली असल्याचे समोर आले. सर्व कागदपत्रे घेवून तक्रारदार सातारा शहर पोलिस ठाण्यात आले व त्यांनी संशयितांविरुध्द तक्रार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सपोनि श्रीकृष्ण पोरे पुढील तपास करत आहेत.
 

 

 

tags ; Satara,news,Demonstrating,dead,alive, land, fraud, 


  •