Mon, Aug 19, 2019 00:47होमपेज › Satara › सातार्‍यात  ‘नविआ’चे कंदील पेटवून आंदोलन (Video)

सातार्‍यात  ‘नविआ’चे कंदील पेटवून आंदोलन (Video)

Published On: Feb 02 2018 8:08PM | Last Updated: Feb 02 2018 8:05PMसातारा: प्रतिनिधी

नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी कंदील पेटवून अनोखे आंदोलन केले. सातारा नगरपालिका कार्यालयासमोरील उद्यानाच्या दुरावस्थेचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

नगरपालिका कार्यालयासमोरील अभयसिंहराजे स्मृती उद्यानाची दुरावस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नगरसेवकांनी अभिनव पद्धतीने निषेध नोंदवला. नगरसेवकांनी शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५२ कंदील पेटवून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. उद्यानात लावलेल्या कंदीलामुळे स्मृती उद्यान परिसर सायंकाळी उजळून निघाला होता. 

(व्हिडिओ : साई सावंत)