Mon, May 20, 2019 08:40होमपेज › Satara › तिच्याही वहीत असेल एखादं फूल माझ्यासाठी

तिच्याही वहीत असेल एखादं फूल माझ्यासाठी

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 7:53PMसातारा : मीना शिंदे

व्हॅलेंटाइन  डे साजरा करण्यासाठी तरुणाईची उत्कटता शिगेला पोहचली आहे. व्हॅलेंटाइन डे उजाडायच्या आधीच  सोशल मिडीयावर व्हॅलेनटाईनच्या प्रेमसंदेशांना उधाण आले आहे.  त्यातच यंदाचा व्हॅलेंटाईन बुधवारी आल्याने अनेकांना सोशल मिडियाचा फार मोठा आधार  झाला आहे. फेसबुक आणि व्हॉटसअपवर मेसेजेसचा नुसता पाऊस पडत आहे. जसजसा व्हॅलेंटाईन डे जवळ येतो तसतशी तरुणाईची हुरहुर वाढत आहे. प्रपोज डेला ज्यांना प्रपोज करण्याचे धाडस होत नाही, असे प्रेमवीर प्रपोजसाठी व्हॅलेंटाईनचा मुहूर्त गाठणार आहेत. मग, पहिल्यांदा केलेला प्रपोज हा खूप स्पेशल असला पाहिजे, यासाठी  प्‍लॅनिंग तर पाहिजेच. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असतं. 

सध्या वेगवेगळे डेज तरूणाई मोठ्या धडाक्यात साजरे करताहेत. आणि सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे ती 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची. याच दिवशी अनेक प्रेमी त्यांच्या मनातील भावनांना मोकळे करतात. त्यांच्या प्रिय व्यक्तींना ते सगळं काही सांगून टाकतात. पण हे मनातलं सगळं काही सांगून टाकणं वाटतं तितकं सोपं नसतं. अशावेळी सोशल मिडियाचा आधार युवापिढी घेत आहे.  कुणालाही सल्ला देणं सोपं आहे पण ती गोष्ट प्रत्यक्षात करणं हे त्याहून कठिण. पण, तरीही  प्रपोज करण्याच्या काही खास आणि वेगळ्या टिप्स  तरुणाई अजमावत असते.

विचारीन विचारीन म्हणतोय, पण 
धाडस होत नाही...
तिच्यासाठी घेतलेलं फुल 
वहितच 
कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस 
धरतयं ...
कितीही ठरवून गेलो तरी , ह्रदय 
मात्र बोलत नाही ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण 
धाडस होत नाही ...
वाटतयं , तिच्याही वहित असेल 
एखादं फुल माझ्यासाठी,
का आहे ही भोळी समज या 
वेड्या मनासाठी ?
आयुष्यातलं पहिलं - वहिलं प्रेम 
मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण 
धाडस होत नाही ...
अशा कविता सोशल मिडियावरुन सध्या फिरत आहेत.

अनेकजण अबोल नात्यांचा, आबोल प्रेमाचा आजच्या दिवशी जाहिर प्रकटन करतात. तर, काही आपल्या मुक्या प्रेमभावना  शब्दरुपाने व्यक्त करतात.  एका टेबलभोवती बसून  मैत्रीच्या आणाभाका याच दिवशी घेतल्या जातात. दिवसभर  वातावरण गुलाबमय  होऊन गुलाबरुपाने प्रीतीची उधळण व्हॅलेंनटाईन डेला केली जाते.  यंदाचा व्हॅलेंटाइन डे बुधवारी आल्याने महाविद्यालयीन तरुणाईची थोडीशी पंचायत होणार आहे. पण त्यावर मात न करेल ती तरुणाई कसली? कॉलेज कॅटिन व कॉलेज परिसरातील कॉफी हाऊसमध्ये  युवक-युवतींचे ग्रुप उद्याच्या नियोजनात व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे. 
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे !!!
पाहशील जिथे जिथे नजर उचलून...
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात द:ुखांचे अश्रू....
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं.....
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं... !
अशा संदेशांनी अवघ सोशल विश्‍व बहरुन गेलं आहे.