Wed, Nov 21, 2018 13:15होमपेज › Satara ›  सातारा : वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकाने वाचवले प्राण

 सातारा : वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याचे युवकाने वाचवले प्राण

Published On: Jul 22 2018 1:42PM | Last Updated: Jul 22 2018 1:42PMकुडाळ : प्रतीनिधी 

जावली तालुक्यातील म्हाते बुद्रुक ते मोहाट दरम्यान वेण्णा नदीच्या पत्रात म्हाते येथील शेतकरी विष्णू शेलार यांचा पाय घसरून नदीत पडल्याने ते पूर आलेल्या पाण्यातून वाहून जात होते. त्याचवेळी नदी लागतच असणाऱ्या रवींद्र वाघे या युवकाने नदी पात्रात उडी घेऊन शेलार यांचे प्राण वाचवले.

 या घटनेची माहिती पोलिस पाटील आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी नदीच्या पाण्यात उडी घेऊन शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुढे आले. शेलार यांना बाहेर काढल्यानंतर ते बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात  आले.