Tue, Nov 20, 2018 05:27



होमपेज › Satara › कोर्टासमोर कार दुभाजकावर आदळली : दोन गंभीर

कोर्टासमोर कार दुभाजकावर आदळली : दोन गंभीर

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:41PM



सातारा : प्रतिनिधी

सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयासमोर (कोर्ट) शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुभाजकावर चारचाकी कार आदळल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामध्ये कारच्या दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या असून कारचा चक्‍काचूर झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी पोवई नाक्यावरुन बाँबे रेस्टॉरंटकडे कोल्हापूर पासींगची कार भरधाव वेगाने निघाली होती. कार जिल्हा न्यायालयाच्या 

समोर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट दुभाजकावर जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या. क्षणात मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. कारमधून जखमींना तत्काळ परिसरातील नागरिकांनी बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील वाहतूक  सुरळीत करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातामध्ये कारचा चक्‍काचूर झाला असून सुदैवाने इतर कोणीही जखमी झालेले नाही. जखमींना खासगी रुग्णालयात नेल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत.