Wed, Apr 24, 2019 00:01होमपेज › Satara › फेसबुक पोस्‍ट लिहून व्‍यापार्‍याची आत्‍महत्‍या

फेसबुक पोस्‍ट लिहून व्‍यापार्‍याची आत्‍महत्‍या

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 17 2018 9:50AMकराड : प्रतिनिधी 

नोटाबंदी व जीएसटीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या कराड येथील सराफ व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी 12.20 च्या सुमारास उघडकीस आला. राहुल राजाराम फाळके (वय 32, रा. वनवासमाची ता. कराड) असे त्या युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली असून नोटाबंदी व जीएसटीमुळे आर्थिक अडचणीत आल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. ही नोटही त्याने  फेसबूकवर शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरवडे रेल्वे स्टेशनजवळ त्याने मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राहुल  फाळके याचे शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर गणपती मंदिराजवळ मंगलमूर्ती     ज्वेलर्सचे दुकान आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे तो आर्थिक अडचणीत आला होता. त्याला व्यवसायही बंद करावा लागल्याने अनेकांची देणी भागविणे त्याला अशक्य झाले. यातूनच तो नैराश्येच्या गर्तेत अडकला होता. या नैराश्यातूनच त्याने दुपारी 12.20 च्या सुमारास शिरवडे रेल्वेस्टेशन नजीक मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपण जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यवसाय बंद पडल्याने आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवरून व्हायरल केली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. त्याच्या फेसबुक अकौंटवरून व्हायरल झालेल्या पोस्टमधील  मजकूराचा तपशील पुढीलप्रमाणे..

सवार्ंना माझा शेवटचा नमस्कार

जेव्हापासून मोदींनी नोटा बंदी केली, तेंव्हा पासून सोने-चांदी  व्यवसायाला उतरती कळा लागली.हे कमी की काय म्हणून जीएसटी लागू केला. त्यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत आला. आधीच आमचा व्यवसाय उधारी शिवाय चालत नाही. त्यामुळे उधारीत पैसे अडकले. खूप लोकांवर विश्‍वास ठेवून त्यांना मदत केली. खूप जणांना अडचणीतून बाहेर आणले. पण आयुष्यात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीने माझा फक्त विश्‍वासघात केला.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानुसार एक शिवसैनिक म्हणून समाजामध्ये राहताना नेहमी ताठ मानेने जगलो, पण आज काही चूक नसताना मान खाली घालून मी जगू शकत नाही. मला कोणालाही फसवायच नव्हतं. माझा तसा स्वभाव नाही. पण प्रत्येकाने मला फसवले आणि त्यामुळे मला सवार्ंना फसवून जावे लागत आहे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये आणि कोणावर ही कोणतीही कारवाई करू नये. माझे जीवन उद्ध्वस्त  झालंय. मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं. घरातील सर्वांसह माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला खूप मीस करेन. 

आणि सर्वात महत्वाचं, यापुढे कृपा करून शिवसेनेला निवडून द्या. कारण फक्त थापा मारणारे आणि भाषणबाजी करणारे खूप नेते आहेत, पण उद्धव ठाकरे यांना मन आहे. ते उत्कृष्ट वक्ता नसतील पण जनतेच्या वेदना त्यांना नक्की समजतात. जेव्हा महाराष्ट्रावर भगवा फडकेल तीच मला खरी श्रद्धांजली असेल. माझी फक्त एकच विनंती आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेना आणि शिवसैनिकांनी घ्यावी.  ही कळकळीची आणि शेवटची विनंती.

Tags : satara, satara news, GST, Businessman Suicide,