Sat, Feb 16, 2019 06:36होमपेज › Satara › सातारा : चंदनचोरीनंतर आता तहसीलदारांची रोकड चोरी

सातारा : चंदनचोरीनंतर आता तहसीलदारांची रोकड चोरी

Published On: Sep 06 2018 2:46PM | Last Updated: Sep 06 2018 2:45PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला  तहसीलदार अमिता विजय तळेकर-धुमाळ (वय ४०, रा. सातारा) यांच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. चंदनचोरी झाल्यानंतर  दुसऱ्याच दिवशी तहसीलदाराचे पैसे चोरी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अमिता तळेकर-धुमाळ या दिवसभर त्यांच्या दालनात काम करीत होत्या. दरम्यान, सायंकाळी बैठकीच्या कामानिमित्त त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेल्या. यावेळी धुमाळ यांनी स्वत:ची पर्स टेबलावर ठेवली होती. चोरट्यानी हीच संधी साधत त्यांची पर्स लंपास केली. यात दहा हजार रुपये, बँकेचे एटीएम, पॅनकार्ड, आधारकार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती.

बैठक संपवून त्या दालनात आल्या असता त्यांच्या टेबलावर पर्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. याबाबत रात्री उशिरा सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.