होमपेज › Satara › गर्भपाताचे किट, गोळ्या सापडल्या

गर्भपाताचे किट, गोळ्या सापडल्या

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 12:00AMसातारा : प्रतिनिधी

गर्भपातासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्या आणि त्याच्या किटचा साठा कोंडवेलगतच्या हिरापूर, ता. सातारा येथे सापडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय औषधे विकण्याचा परवाना नसतानाही हा साठा व किट जवळ बाळगल्याचे उघडकीस आले आहे. विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडुरंग देशमुख (रा. मलकापूर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अन्‍न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला असून, या विभागाचे निरीक्षक विजय नांगरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हिरापूर फाट्याजवळ राहणार्‍या अजय  सपकाळ याच्या घरात गर्भपातासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्यांचा साठा विनापरवाना करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. त्यानुसार पथकाने दि.17  रोजी दुपारी सपकाळ याच्या घरावर छापा टाकला. छाप्या दरम्यान पथकाला घरात गर्भपाताची औषधे असल्याचे समोर आले. औषधांचा साठा करणार्‍या सपकाळ याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नव्हता. याशिवाय हे किट स्त्रीरोग तज्ञ तसेच डॉक्टरांशिवाय कोणाला मिळत नाही. संशयित विजय सपकाळ याला अमिर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांनी मदत केली. असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जप्‍त केलेला औषधाचा साठा 44 हजार 629 रुपयांवा असून याचा तपास हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.
 

 

tags : Satara,news, Abortion pills kit supply hirapur