Mon, Jan 21, 2019 01:32होमपेज › Satara › जवानांमुळेच देश, आपण सुरक्षित

जवानांमुळेच देश, आपण सुरक्षित

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 11:54PM

बुकमार्क करा
मसूर : वार्ताहर

देशाच्या सीमेवर जवान कर्तव्य भावनेतून लढून आपले संरक्षण करत आहेत. प्रसंगी ते प्राणीची आहुती देतात. त्यामुळे आजवर आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, असे सांगत अशीच भावना स्काऊट गाईडच्या मेळाव्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

यशवंतनगर (ता. कराड) येथे आयोजित करण्यात आलेल्या तेविसाव्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्याच्या पारितोषिक वितरण व समारोपप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी आ. बाळासाहेब पाटील, पंचायत समिती सभापती शालन माळी, माजी सभापती देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

संजीवराजे नाईक - निंबाळकर म्हणाले, पुस्तकी ज्ञानासह स्काउट गाईड प्रशिक्षण मोलाचे आहे. स्व. पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेला मेळावा खर्‍या अर्थाने त्यांनी केलेल्या समाजकारणाचा वसा आहे. आगामी काळात स्काउट गाईड मेळाव्यास जिल्हा परिषद माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासनही निंबाळकर यांनी यावेळी दिले. 

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, मुलांनी विविध गुणदर्शनाद्वारे कलेचे चांगल्या प्रकारे सादरीकरण केले. मेळाव्याचे नियोजन चांगले झाले. स्काऊट गाईडच्या जिल्हा संस्थेसह माध्यमिक विभागाचे चांगले सहकार्य लाभले. 

मानसिंगराव जगदाळे, शबनम मुजावर, संजय जाधव, शुभम देसाई, रजनी पाटील यांचीही भाषणे झाली. वनिता बाबर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी जसराज पाटील, प्रांजली साळुंखे, सुषमा नागे, वनिता माने, सुरेखा जाधव, विनिता पलंगे, आर. एल. नायकवडी, प्रणव ताटे, रमेश चव्हाण, रेखा घाडगे, जयश्री कदम यांच्यासह सह्याद्रीचे संचालक उपस्थित होते.