Wed, Feb 20, 2019 07:18होमपेज › Satara › पुसेसावळीत चंदन चोरी

पुसेसावळीत चंदन चोरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुसेसावळी : वार्ताहर

येथील कडेपूर रस्त्यालगत असलेल्या पाटील मळ्यातील शिवाराच्या बांधावर असलेले चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. चंंदन चोरीकडे चोरट्यांनी लक्ष वळवले असल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

या परिसरात पूर्वीपासून चंदन चोरी व तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.गेल्या दोन तीन वर्षांत चंदन चोरीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र,सध्या चंदन चोर डोके वर काढू लागले आहेत.त्यामुळे त्यांचा योग्य तपास होऊन वेळीच आळा घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 

Tags : satara,  Pusesavali news, crime, Sandalwood, Sandalwood Theft,


  •