Tue, Apr 23, 2019 01:55होमपेज › Satara › साडेतीन वर्षात ‘त्यांनी’ जनतेला काय दिले

साडेतीन वर्षात ‘त्यांनी’ जनतेला काय दिले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर (वार्ताहर) :

गेल्या साडेतीन वर्षात पाटणकर पिता - पुत्रांनी सर्वसामान्य जनतेकडे पाहिलेले नाही. त्यांच्यामुळे एक रूपयाचा निधीही सर्वसामान्यांच्या मुलभूत सोयी - सुविधा सोडवण्यासाठी मिळाला नसल्याचा दावा करत आ. शंभूराज देसाई यांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह सत्यजित पाटणकर यांच्यावर जोरदार टिका केली आहे. सलतेवाडी, वाझोली (ता. पाटण) येथे आ. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून सभामंडपास मंजुरी मिळाली आहे. या सभामंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती सदस्या सिमा मोरे, रघुनाथ माटेकर, बबनराव पाटील, वाझोलीचे सरपंच राजेश चव्हाण, उपसरपंच अशोक मोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

आ. देसाई म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने 

माझ्यावर विश्‍वास टाकला. हा विश्‍वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत आपण कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. ज्या गांवाना  बारमाही जोडणारे रस्ते नव्हते, त्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने निधी मंजूर करुन आणला आहे. जी गावे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित होती, अशा 56 गावांना शासनाकडून मंजुरी  मिळवली आहे. वाझोली गावासाठी तीन वर्षात 75 लाखांचा निधी दिला आहे. 
विकास काय असतो हे खर्‍या अर्थाने गेल्या साडेतीन वर्षातील कामे पाहून लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.

मात्र जनतेला देण्यासारखे काही नसताना मला निवडणुकीत विजयी करा, असे म्हणणार्‍या विरोधकांनी साडेतीन वर्षात काय दिले आहे? याचे अवलोकन करावे. पुढील वर्षीच्या निवडणुकीची विरोधकांना स्वप्ने पडू लागली असून आपणही सावधता बाळगणे गरजेचे असल्याचे आ. देसाई यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.तसेच पुढील दीड वर्षात प्रलंबित कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याची ग्वाही आ. देसाई यांनी यावेळी दिली. यावेळी रामचंद्र सलते, सदाशिव शेलार, दिलीप शेलार, शंकर शेलार, दत्तात्रय सलते, विमल सलते यांच्यासह सलतेवाडी येथील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. आनंदा मोरे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
 

 

 

tags ; Sanbor,news,Shambhuraj, Desai,heavy, criticism,in Sanbor


  •