Wed, Jan 16, 2019 09:12होमपेज › Satara › धरणातील पाणी सोडण्यास संमती

धरणातील पाणी सोडण्यास संमती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर

आ. शंभूराज देसाई यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर साखरी प्रकल्पग्रस्त आणि काळगाव ग्रामस्थांनी टप्प्या- टप्प्याने पाणी सोडण्यास संमती दिल्याने काळगांव परिसरातील शेती आणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटल्याने येथील जनतेने आ. शंभूराज देसाई यांचे आभार  मानले आहेत. साखरी धरणाअंतर्गत अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा अन्यथा धरणातील एक थेंब देखील पाणी धरणा बाहेर जावू देणार नसल्याची ठाम भूमिका साखरी प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने धरणाखालील गावांचा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता.यावर आ. देसाई यांनी कृष्णा खोर्‍याच्या अधिकार्‍यांना तातडीने धरणस्थळावर जावून पहाणी करून तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितल्याने कार्यकारी अभियंता डी.आर. डमाळे,सहा. अभियंता  उत्तम दाभाडे,कार्यकारी अभियंता संजय बोडके यांनी साखरी धरणास भेट देऊन प्रकल्पग्रस्थ व शेतकरी यांची बैठक घेवून प्रलंबीत कामांची पहाणी केली.  

पूनर्वसन, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, 1240 मीटरचा नियोजित रींगरोड तसेच 1210 मीटरचा वाढीव रींगरोडचे नियोजन , धरणातील पाणी पिण्यासाठी वापरत असलेने शुद्धिकरण व स्वच्छतेसाठी अंमलबजावणी करणे, धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टिने दुपटीने अंदाज पत्रक तयार करणे अशी तरतूद करून घेवू अशा आश्‍वासनानंतर पाणी सोडण्यास प्रकल्पग्रस्त आणी काळगांव ग्रामस्थ तयार झाले असुन येत्या तीन तारखेला याच मागण्यासंदर्भात आ. देसाई यांनी कृष्णाखोर्‍याचे अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या समवेत बैठक लावली आहे.  या बैठकीत ठोस निर्णय होईल असा विश्‍वास पाटण पं स. गटनेते पंजाबराव देसाई, माजी सरपंच गोविंद गोटूगडे, भरत दूधडे, जयवंत देसाई, राजू काळे यांच्यासह इतर प्रकल्पग्रस्त व काळगांव ग्रामस्थांनी सांगीतले.                    


  •