Sat, Apr 20, 2019 10:19होमपेज › Satara › भिडे गुरुजींसाठी सातार्‍यात सन्मान मोर्चा

भिडे गुरुजींसाठी सातार्‍यात सन्मान मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पुण्यातील शनिवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेत उमर खालिद, जिग्‍नेश मेवाणी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी भडक भाषणे केली. त्यांनीच भीमा कोरेगाव दंगल घडवून आणली. गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी, तसेच मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे सन्मानपूर्वक मागे घ्यावेत, भीमा कोरेगाव दंगलीचे सूत्रधार प्रकाश आंबेडकर असून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी भिडे गुरुजींसाठी सातार्‍यात सन्मान मोर्चा काढला. दरम्यान, भिडे गुरुजींवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास विधानभवनाला घेराव घालण्याचा इशारा धारकर्‍यांनी दिला.

राजवाडा (गांधी मैदान) येथे हिंदुत्ववादी संघटना तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हजारोंच्या संख्येने जमले. यावेळी विजयाताई भोसले, शहाजीबुवा रामदासी, विठ्ठल स्वामी यांनी मोर्चामागील पार्श्‍वभूमी विषद केली.  गोलबागेतील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातल्यावर मोर्चास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, हिंदुओंकी जान है.. भारत हिंदुस्थान है, नही चलेगी..नही चलेगी-तानाशाही नही चलेगी, भिडे गुरुजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,  भिडे गुरुजी झिंदाबाद-प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोती चौक-शाहू चौक-राजपथावरुन निघालेला मोर्चा पोवईनाक्यावर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.  त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रकाश आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध असून त्यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करा, त्यांची माओवादावर निष्ठा आहे पण देशावर नाही, हिंदू हा भोळा सांब असून खवळला तर तुडवून मारु, अपमानाचा बदला घेणे हे धारकर्‍याचे कर्तव्य आहे, रस्त्यावर उतरलोच आहोत तर ठोकाठोकी झालीच पाहिजे, भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांच्यावरील गुन्हे मागे  न  घेतल्यास विधान भवनाला  घेराव घालणार, असा इशारा धारकर्‍यांनी दिला. 

यावेळी विनायक पावसकर, काशीनाथ शेलार, संदीप जायगुडे यांनी भावना व्यक्‍त केल्या. पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारकवर यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, संतोषभाऊ जाधव, राजेंद्र चोरगे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, सुनील काळेकर  आदि उपस्थित होते. दरम्यान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने जिल्हाधिकार्‍यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वढू बुद्रुक येथे गोविंद महाराज यांच्या समाधीजवळ वादग्रस्त फलक लावणार्‍याची चौकशी करावी, त्यांना अटक झाली पाहिजे, शनिवारवाड्याच्या प्रांगणात घेतलेल्या एल्गार परिषदेत उमर खालिद, जिग्‍नेश मेवाणी, माजी न्या. बी. जी. कोळसे  यांनी भडक भाषणे करुन दंगल घडवून आणली. त्यांची चौकशी करुन  त्यांना अटक झाली पाहिजे, भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या बंदनंतरच्या दंग्यात सार्वजनिक मालमत्‍तेचे झालेले नुकसान प्रकाश आंबेडकर व संबंधितांकडून वसूल करावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेला टी शर्ट घातला म्हणून राहूल फटांगडे या युवकाची हत्या झाली.

मात्र, संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यात आली नाही. दंगलीनंतर पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये चार नक्षलवादी पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीचे पुढे काय झाले? तीन-चार वर्षांपासून भिडे गुरुजी त्या परिसरात गेले नसताना कुणाच्यातरी सांगण्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात त्यांचे नाव घेतले, आंबेडकरांना माहिती पुरवणार्‍यांची चौकशी करावी, दंगली दिवशी भिडे गुरुजी सांगली ते इस्लामपूर येथे होते हे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने खोटी फिर्याद देणार्‍या महिलेला ताब्यात घेवून चौकशी करावी, खोट्या आरोपांमुळे गुरुवर्य भिडे गुरुजींना मनस्ताप सहन करावा लागल्याने दोषींवर कारवाई  व्हावी. मोर्चानंतर धारकर्‍यांनी मोर्चामार्ग स्वच्छ करुन शिस्तीचे दर्शन घडवले.

Tags : Satara, Satara News, Samman rally, Satara,  Bhide Guruji


  •