Sun, May 26, 2019 12:36होमपेज › Satara › मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे यांना बरोबर घेऊनच करणार : संभाजीराजे  छत्रपती

मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे यांना बरोबर घेऊनच करणार : संभाजीराजे  छत्रपती

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 30 2018 10:23PMभिलार : वार्ताहर

मराठा आरक्षणाचे नेतृत्व खा. श्री. छ. उदयनराजेंना बरोबर घेऊनच करणार असून नेतृत्व त्यांनी केले काय आणि मी केले काय? प्रश्‍न सुटणे महत्वाचे आहे. आरक्षण मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजीनामे देऊन प्रश्‍न सुटणार नाहीत. यापेक्षा त्यांनी पदावर राहूनच मराठा आरक्षणासाठी आग्रही रहायला हवे, अशी भूमिका संभाजीराजे  छत्रपती यांनी पाचगणी येथे  मांडली. 

संभाजीराजे  छत्रपती  पाचगणी येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना आरक्षणाबद्दल त्यांनी हे मत मांडले. वाघ आपल्या जंगलाचा राजा असतो. आज पहिल्यांदाच मी उदयनराजेंच्या इलाख्यात आलोय. येण्याआधी मी दबकत होतो, पण पाचगणी घाटाच्या वर असल्याने थोडासा सावरलो. कारण पाचगणी कॉस्मोपॉलिटीन शहर आहे, असे सांगत संभाजीराजे  छत्रपती यांनी श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्यावरील आपले प्रेम अधोरेखित केले.

शहरात प्रथमच आलेल्या संभाजीराजे  छत्रपती यांनी हळूवारपणे उदयनराजेंबरोबर असलेल्या मैत्रीविषयी खास माहिती दिली. राज्यात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्यांविषयी जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे, हाच धागा पकडून संभाजीराजे  छत्रपती म्हणाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच मी पाचगणीत आलो आहे. हा भाग आमच्या उदयनराजेंच्या इलाख्यात आहे. पण, पाचगणी सर्वधर्मसमभाव जपणारे शहर असल्याने माझ्या इकडे येण्याने काहीच अडचण होणार नाही. 

पाचगणी शहर स्वच्छते बाबतीत देशात नंबर वन आहे याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.  दरम्यान,  या भागात माझे मित्र कमी होते. पण आज मला नवीन कुटुंब मिळाले असल्याची भावनिक प्रतिक्रिया देखील राजेंनी यावेळी व्यक्त केली.