Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Satara › इतिहास समजण्यासाठी खरा इतिहास वाचा

इतिहास समजण्यासाठी खरा इतिहास वाचा

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 10:35PMउंब्रज : प्रतिनिधी

आपण सर्व देव, देवतांना मानतो परंतु त्याही पेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो. समाज जय भवानी जय शिवाजी या घोषणा देतो मात्र आपले दुर्दैव असे की आपण इतिहासाच्या खोलात जात नाही, अशी खंत संभाजी भिडे (गुरूजी) यांनी व्यक्त केली. दरम्यान इतिहास समजण्यासाठी खरा इतिहास वाचा असेही ते म्हणाले. 

उंब्रज ता. कराड येथे धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या व्यक्तींच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सचिन डुबल, अंकुश माने यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी भिडे म्हणाले, आपण छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांचे चरित्र वाचले आहे का? जो समाज, देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही तो समाज देश, विश्‍वाच्या संघर्षात वाचू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत स्वार्थाशिवाय लोकांना काही कळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी एव्हरेस्ट शिखर सर करणारे  प्रजित परदेशी, गोरक्षक शिवशंकर स्वामी, गाव पाणीदार करण्यासाठी एकाकी झुंज देणारे बहिण भाऊ रोहित बनसोडे व रक्षिता बनसोडे, शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे तानाजीराव कदम यांचा धर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास प्रतिष्ठाणचे प्रभुत कदम, दिगंबर शिंदे, प्रमोद चव्हाण, मकरंद सुर्यवंशी, अधिक साळुंखे, गणेश पोळ, महेश जाधव, विशाल जाधव यासह कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.