Wed, Nov 21, 2018 15:43



होमपेज › Satara › कोयना धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सुरक्षतेचा इशारा

कोयना धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सुरक्षतेचा इशारा

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 5:44PM



सातारा (जिमाका) : प्रतिनिधी  

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ जुन २०१८ पासून सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे. व सद्य: स्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरु आहे. आज  १६ जुलै २०१८ रोजी सकाळी ८ वाजता कोयना जलाशय पाणी पातळी 649.122 मी. असून जलाशयामध्ये 69.78 टी.एम.सी. एवढा एकूण पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणाच्या सांडव्याची माथा पातळी 650.291 मी. एवढी आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाचे प्रमाण व येणारी पाण्याची आवक अशीच राहिल्यास अथवा वाढल्यास येत्या 48 तासामध्ये अथवा तत्पुर्वी सांडवा माथा पातळी 650.291 मी. एवढी होण्याची शक्यता आहे.

सध्या सुरु असलेले पर्जन्यमान असेच चालु राहिलेस जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारित जलपातळी राखण्यासाठी  18 जुलै 2018 पासून धरण पायथा, विद्युतगृहातून सुमारे 2100 क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सोडावा लागणार आहे. वाढत्या पर्जन्यमानानुसार 19 जुलै 2018 पासून सांडव्यावरुनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. तरी धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागारिकांनी सुरक्षतेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये वीज मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य व पशुधन यांचेही सुरक्षतेची काळजी घ्यावी. असे आवाहन कुमार पाटील कार्यकारी अभियंता कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांनी केले आहे.