Sat, Jan 19, 2019 20:53होमपेज › Satara › कांदा महागल्यावर कोणी टाचा घासून मेले का? : सदाभाऊ खोत(Video)    

कांदा महागल्यावर कोणी टाचा घासून मेले का? : सदाभाऊ खोत(Video)  

Published On: Feb 16 2018 2:59PM | Last Updated: Feb 16 2018 3:05PMकराड : प्रतिनिधी 

हाताला कधीही माती लागली नाही, तरी ते लोक शेतकऱ्यांचे धोरण ठरवतात आणि शेतकऱ्यांना मारतातही. कांदा तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनाचे दर वाढले, की लगेच महागाई वाढली म्हणून बोंब ठोकली जाते. कांदा महाग झाल्याने कांदा खाता आला नाही आणि त्यामुळे कोणी टाचा घासून मेले आहे का? ते दाखवा, असे आव्हान देत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोन्याचे, चॉकलेटचे दर वाढले की महागाई वाढत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयात शुक्रवारी शेतकरी शिवार, कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाकडून या मेळाव्याचे तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ठोबळे, महावीर जंगटे, तुषार पवार, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांच्यासह कृषी संशोधक, शेतकरी, विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते.