Sat, Feb 23, 2019 20:52होमपेज › Satara › नाईमबोमवाडीतील खूनप्रकरणी चौघे गजाआड

पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी केले मुंडण

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:14PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

नाईकबोमवाडी, ता. फलटण येथे सचिन उर्फ शेट्या विश्‍वनाथ ठाकूर याचा संगनमताने डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणातील चौघे संशयित शनिवारी म्हसवड बसस्थानकात आले असता पोलिसांनी सापळा रचून एसटीमध्येच त्यांना अटक केली. पोलिसांनी ओळखू नये म्हणून चौघांनीही मुंडण केले होते, मात्र, हा डाव फसला व ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

याबाबत पोनि अशोक शेळके यांनी दिलेली माहिती अशी, नाईकबोमवाडीतील सचिन ठाकूर याच्या खूनप्रकरणातील संशयित सतीश उर्फ बंड्या रमेश सगर वय 21, प्रशांत उर्फ डिग्या भानुदास दिघे वय 26 व वैभव व्यंकट नागझरकर सर्व रा.पुणे  हे तिघे वडगाव, ता. माण  येथे संशयित प्रकाश उर्फ फाक्या हिराचंद ओबासे वय 26 याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथक रवाना झाले.

पेहराव बदलून वेळोवेळी हुलकावणी देणार्‍या संशयितांनी याखेपेला पोलिसांनी आपणास ओळखू नये म्हणून डोक्याचे मुंडण केले होते. वडगाव येथून पोलिसांना चकवा देवून ते म्हसवड बसस्थानकात आले. तथापि फलटण ग्रामीणचे सपोनि भगवान  बुरसे यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा लावून सर्व संशयितांना सोलापूर-सातारा या एसटीमध्ये अटक केली. संशयितांकडे पोलीसांंनी कसून चौकशी केली असता हा खून भाईगिरीच्या वादातून झाले असल्याची माहिती समोर येत आहे.या कारवाईत सहाय्यक फौजदार सूर्यवंशी, वाडकर, तुपे, भोसले, काळे यांनी कारवाई भाग घेतला .