होमपेज › Satara › सातारा : कर्मचाऱ्यांची निदर्शने;संपाला १०० टक्के पाठिंबा 

सातारा : कर्मचाऱ्यांची निदर्शने;संपाला १०० टक्के पाठिंबा 

Published On: Jun 09 2018 12:57PM | Last Updated: Jun 09 2018 12:56PMसातारा : प्रतिनिधी

गुरुवारी मध्यरात्री पुकारलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप शनिवारीही सुरूच होता. कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

सकाळी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सरकार मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, सरकारचा निषेध असो, सरकारचे हाल काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा करण्यात आल्या. शनिवारी जिल्ह्यातील एकही आगारातून एस.टी.बस सोडण्यात आली नाही. तर खाजगी असणाऱ्या शिवशाही बसेस मात्र सोडण्यात येत होत्या. संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील 36 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. सरकारने आदेश दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

दरम्यान या संपाचा फटका नागरिकांना बसू लागला असून ग्रामीण भागातील सर्व वाहतूक कोलमडली आहे. तर सातारा ते मुंबई प्रवासासाठी 600 ते 800 रुपये दर सुरू झाला आहे. खासगी वडापवाल्यांनी ही याचा फायदा उठवत नागरिकांची लूट सुरू केली आहे.