Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Satara › सातारा : माऊलींच्या वारीत सातारा पोलिस 'भारी'

सातारा : माऊलींच्या वारीत सातारा पोलिस 'भारी'

Published On: Jul 17 2018 5:52PM | Last Updated: Jul 17 2018 5:51PMसातारा : प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली सोहळा सातारा जिल्ह्यातून चार दिवसाच्या मुक्कामानंतर आज सोलापूर जिल्ह्यात जात आहे. पालखीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा,  यासाठी सातारा पोलिस दलाने यंदा हटके कामगिरी केली आहे. 

वारीत 90 चेनस्‍नॅचरनां पकडले

वारीदरम्यान एलसीबी पोलिसानी फुगे विक्रेत्यांच्या पोशाखापासून वारकरी पोशाखामध्ये राहून एकूण 90 चेनस्नॅचर, पिकपॉकीटर, खूनाच्या प्रयत्न करणारे, दरोडा, जबरी चोरीतील संशयितांनी पकडले आहे. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वारीमध्येही सातारा पोलिस भारी’ असे चित्र निर्माण झाले आहे.

ज्ञानेश्वर माउलींची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पालखी दरवर्षी जात असते. या पालखी सोहळ्यामध्ये परदेशी पाहुण्यांपासून विविध राज्यातील लाखो भावीक सामील होत असतात. अशा या भक्तीभावाने निघणार्‍या वारीमध्ये चोरट्यांचाही उपद्रव असतो. वारीदरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील पोलिस खबरदारी घेत असतात. यंदा सातार्‍यात पालखी चार दिवस मुक्कामाला असल्याने सातारा जिल्हा पोलिस दलावर बंदोबस्ताचा ताण होता.

 वारकरी बनून 'नजर'

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग तथा एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्न जर्‍हाड यांच्या कर्मचारीही बंदोबस्तासाठी आदल्या दिवसांपासून तैनात होते. चोरट्यांचा योग्य वेळेतच बंदोबस्त व्हावा, यासाठी एलसीबीचे पोलिस चक्क  साध्या वेशात फुगे विक्रेते, फळविक्रेत्यांसह चक्क वारकरी बनून ‘नजर’ ठेवून होते.

सातारा पोलिसांची अभिनंदनीय कामगिरी

वारीतील अशा पोलिस बंदोबस्तामुळे कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसून उलट त्याचा फायदा झाल्याने पोलिस कर्मचार्‍यांचे पोलिस दलातून अभिनंदन होत आहे.