Mon, Nov 19, 2018 09:26होमपेज › Satara › सातारा : खंबाटकी घाटात धावत्‍या कारने घेतला पेट 

सातारा : खंबाटकी घाटात धावत्‍या कारने घेतला पेट 

Published On: May 29 2018 10:07PM | Last Updated: May 29 2018 10:07PMखंडाळा (जि. सातारा): वार्ताहर

 खंबाटकी खंडाळा घाटात  भैरवनाथ मंदिराच्यापुढे पुणे ते साताराकडे जाणाऱ्या तिसऱ्या वळणावर सचिन पोपट धुमाळ (रा.आकुर्डी, पुणे) यांच्या मालकिची मारूती सुझुकी झेन कारने (न.MH12-BV2359)  अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत संपूर्ण कारसह कारमधील सर्व साहीत्य जळून खाक झाले. 

 सचिन धुमाळ हे बावधन (ता. वाई) येथे निघाले होते . वाहन चालवत असताना खांबाटकी घाटात गाडीच्या इंजिनमधून धूर येवू लागल्याने त्यांनी गाडी बाजूला घेऊन थांबवली . गाडीतून उतरण्यापूर्वीच इंजीनने पेट घेतला होता. धुमाळ हे तातडीनेने पत्नीसह गाडीतून बाहेर आले. तोपर्यंत संपूर्ण गाडीने पेट घेतला. या आगीत गाडीसह आतील सर्व साहित्य जळून गेले असून, धुमाळ आणि त्‍यांच्या पत्‍नी दोघेही सुखरूप बचावले.