Mon, Jun 17, 2019 03:09होमपेज › Satara › क्रांतिची मशाल पत्रकारांकडेच : खा. शरद पवार

क्रांतिची मशाल पत्रकारांकडेच : खा. शरद पवार

Published On: May 10 2018 2:02AM | Last Updated: May 10 2018 1:07AMसातारा : प्रतिनिधी

देशात आणि राज्यात अस्वस्थ वातावरण आहे. सामान्य माणूस बेहाल आहे, तो रस्त्यावर उतरत आहे अशावेळी पुन्हा एकदा क्रांतिची गरज आहे. तुमच्यासारख्या पत्रकारांनी क्रांतीची मशाल हातात घेतली पाहिजे, असा आग्रह देशाचे माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी धरला. दरम्यान, ‘दर्पण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल खा. शरद पवार यांनी दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना निमंत्रण देवून शासकीय विश्रामगृहावर सत्कार केला.

कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी खा. शरद पवार जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आले. विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याशी खा. शरद पवार यांची कमराबंद चर्चा सुरु होती. रामराजेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचवेळी काही चांगले कार्यक्रम हुकल्याचे शरद पवार बोलून गेले. आ. शिवेंद्रराजे यांनी लगेचच सातार्‍यातील दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना आपल्या हस्ते पुण्यात ‘दर्पण’ पुरस्कार दिला जाणार होता. आपण याही सोहळ्याला येवू शकला नाही असे निदर्शनास आणून दिले. त्यावर लगेचच पवार यांनी ‘शिवेंद्रराजे त्यांना बोलावून घ्या. इथे त्यांचा सत्कार करु,’ असे सांगितले. विश्रामगृहावर खा. शरद पवार यांनी हरीष पाटणे यांचा बुके देवून ‘दर्पण’ पुरस्काराबद्दल सत्कार केला. पत्रकारितेतील प्रदीर्घ वाटचालीची माहितीही जाणून घेताना शरद पवार यांनी पाटणे यांचे अभिनंदन केले. राज्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपूरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशीही त्यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत चर्चा केली. 

खा. शरद पवार म्हणाले, ‘दर्पण’ पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख मीच रवींद्र बेडकीहाळ यांना दिली होती. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे मला येता आले नाही. 
शेवटी जयंत पाटील यांच्याकडे ती जबाबदारी दिली. जयंतरावांनी पुरस्कार सोहळा उत्तम झाल्याचे मला सांगितले.  सातारच्या मातीत धाडशी लोक आहेत. तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतले तर देशाचे व राज्याचे चित्र बदलू शकते, असेही पवार म्हणाले. यावेळी राजू भोसले, राजकुमार पाटील, निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 

Tags : satara,  sharad pawar, journalists