Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Satara › निवृत्त महिला पोलिसाची रोकड लांबवली

निवृत्त महिला पोलिसाची रोकड लांबवली

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 11:00PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

दुचाकीवरील महिलेच्या अंगावर कवसकुलीसारखी अंगाला खाज सुटणारी वनस्पती टाकून 25 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. धक्‍कादायक बाब म्हणजे तक्रारदार महिला निवृत्त पोलिस कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.

शोभा महादेव ढाणे (वय 63, रा.कर्मवीर कॉलनी, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शोभा ढाणे या दि. 8 रोजी दुपारी दुचाकीवरुन घरगुती साहित्य घेण्यासाठी येथील एका दुकानात आल्या होत्या. यावेळी दुचाकीच्या डिकीमध्ये रोख रक्‍कम व इतर चांदीचा ऐवज होता. दुकानात साहित्य खरेदी केल्यानंतर डिकीतून पैसे काढून दुकानदाराला दिले. पैसे देऊन बाहेर आल्यानंतर त्यांचे अंग त्यांना खाजवू लागले.

या घटनेनंतर त्या पोलिस वसाहतीमध्ये दुचाकीवरुनच गेल्या. तेथे गेल्यानंतर डिकीमध्ये पैसे व चांदीचा ऐवज नसल्याचे लक्षात आले. पुन्हा त्यांनी दुकानात जाऊन पैशांची पर्स व चांदीचा ऐवज राहिला आहे का? याची पाहणी केली असता तेथे नसल्याचे लक्षात आले. अंगाला खाज सुटणारी वनस्पती टाकून अज्ञात चोरट्याने रोख 23 हजार 500 रुपये व चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 24 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज चोरी केल्याचे लक्षात आले.