Sat, Mar 23, 2019 02:42होमपेज › Satara › २०० वर्षांपासूनची रेठरे बुद्रूकची दिंडी 

२०० वर्षांपासूनची रेठरे बुद्रूकची दिंडी 

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:26PMरेठरे बु॥ : दिलीप धर्मे 

छत्रपती शिवाजीराजे, छ. शंभुराजे, शाहू महाराज यांच्यानंतेेर पुढे पेशव्यांपासून मच्छिंद्रगडाला ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक कार्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजेंपासून अगदी पेशव्यांच्या सोबतही लढताना रेठरे बुद्रुक  येथील बाळाजी विश्‍वनाथ रेठरेकर यांच्या घराण्यांतील व्यक्‍तींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन कर्तव्य निभावले होते. त्यांच्या त्यागाची दखल घेवून छ. शाहू महाराजांच्या परवानगीने पेशव्यांनी रेठरेकरांना मच्छिंद्रगड वतन कारखानीस म्हणून दिला आहेे. तेंव्हापासून नाथांच्या पादुका रेठरेकरांच्या घरी आहेत.आषाढी वारीसाठी पंढरपूरला पालखी सोहळा निघत असताना त्या  पादुका घेण्यासाठी पूर्वीपासून वाजत,गाजत पालखी रेठर्‍यात येत आहे. ेहे या पालखीचे वैशिष्ठ्य असून नाथांच्या कृपेने व भक्‍तांच्या सहकार्याने 200 वर्षाची परंपरा आजही अखंडीत सुरू आहे.

सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा हे छोटसं गाव. छ.शिवाजीराजेंनी अफझलखानाचा वध केल्यानंतर कर्नाटक येथे जात असताना त्यांनी किल्लेमच्छिंद्रगडावर काही काळ वास्तव्य केले होते, असे बोलले जात आहे. याठिकाणी इतिहासाचे महत्त्वप्राप्त असलेला कडा आहे.

विठ्ठू माऊलींचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर आषाढी वारीत याठिकाणाहून हजारो भक्‍त सामिल होत आहेत.किल्लेमच्छिंद्रगडावरून निघालेली पालखी सोहळा अगदी शिस्तबध रित्या वाजत,गाजत ढोलताशांच्या आवाजाने रेठरे येथे येत असतो.नाथांच्या पादुका रेठरेकरांचे 8 वे वंशज गणेश माधवराव  रेठरेकर यांच्या घरी आजही आहेत.पालकीत नाथांच्या पादुका ठेवण्यात येत असतात. त्यावेळी रेठर्‍यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमत असतात.

आषाढीवारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात डोक्यावर तुळशीवृदांवन घेेतलेल्या महिला, चौपदार, माऊली व नाथांची पताका हाती घेऊन नाचत देवाच्या भक्‍तीत तल्‍लीन झालेले भक्‍तजण यांचा सुरेख संगम याठिकाणी पहावयास मिळत असतो. भक्‍तीचा स्वर आणि टाळमृदूंगाच्या आवाजाने सारा परिसर अगदी भक्‍तीसागरात दुमदुमून जातो. पालखीला निरोप देण्यासाठी किल्लेमच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी लवणमाचीपर्यंत परिसरातील भक्‍त मोठ्या संख्येने एकत्रित येत असतात.पालखी समोर घोड्याचे उभ ेरिंगण होत असते. तसेच सुवासिंनी  फुगड्यांचा खेळ खेळतात, लेझिम पताकांनी, विठू माऊलींचा गजर घुमत असतो. 2000 भक्‍तजण असलेल्या या पालखी चालक मल्हारी महाराज, प्रमुख पुजारी राजाराम डिसले, आमिन महाराज शेणोली, बाळनाथ महाराज, चौपदार कृष्णत सुतार तसेच इतर भक्‍तांच्या सहकार्याने पालखी सोहळा सुरू आहे.

गावोगावच्या भाविकांच्याकडून लोकांची सर्वसोय करण्यात येत असते. मच्छिंद्रनाथ विश्‍वस्त मंडळ व भाविकांकडून यासाठी मोठे सहकार्य मिळत असून यातच खरा परमार्थ असल्याचे पालखी प्रमुख मल्हारी महाराज जव्हारी यांनी सांगितले.