Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Satara › रेठरे बु ग्रा.पं.साठी दोन पॅनेलमध्ये होणार लढत

रेठरे बु ग्रा.पं.साठी दोन पॅनेलमध्ये होणार लढत

Published On: Feb 09 2018 2:03AM | Last Updated: Feb 08 2018 7:49PMकराड : प्रतिनिधी 

राजकीयदृष्ट्या संवेदशील व महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णाकाठच्या रेठरे बु॥ ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 25 तारखेस होत आहे.साहजिकच सत्ताधारी गटातून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छिुकांनी गर्दी केली आहे. तर विरोधी गटात सुरूवातीला निवडणूक लढवायची का नाही याबाबत तर्कविर्तक लढविले जात असतानाच त्यांनी पॅनेलची जुळवा जुळवी करून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.त्यामुळे रेठरे ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेल मध्ये सरळ सामना पहावयास मिळणार आहे.

 रेठरे बु ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि.5 ते 10 फेबु्रवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असून दि.15 रोजी माघार आहे.त्याच दिवशी सरपंचपदासह मैदानात कोण असणार हे निश्‍चित होईल.दि.25 रोजी मतदान तर दि.27 तारखेस निकाल लागणार आहे.17 उमेदवार व सरपंच असे 18 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी 9700 च्या दरम्यान मतदार संख्या आहे.त्यात सर्वसाधारण वर्गातील 5 महिला व 5 पुरूष व इतर जातीजमाती मधील 7 उमेदवार असणार आहेत.या ग्रामपंचायतीचे सरपंचपद यावेळी सर्वसाधारण महिला खुले असल्याने सत्ताधारी डॉ.भोसले गटाकडून अनेक इच्छूक महिला उमेदवारांनी मागणी केली आहे.निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी व नंतरही संभाव्य इच्छूक उमेदवारांचा परिचय व विचार विनिमय होण्याच्या दृष्टीने कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते,भाजपाचे सरचिटणीस डॉ.अतुल भोसले यांनी जि.प.सदस्या सौ.शामबाला घोडके यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेवून आढावा घेतला आहे.

निवडणूकीची रणनिती व ग्रामस्थांचे मत आजमावून घेताना भविष्यातील उमेदवार कसा असावा व याबाबत नेतेमंडळीनीच आपला रोखठेाक बाणा सादर केला.तर दुसरीकडे कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी स्वतः या निवडणूकी पासून चार हात लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याचे सध्यातरी दिसत आहे.तर दुसरीकडे इतर पुढार्‍यांच्या पडद्यामागून हालचाली गतीमान झाल्याच्या दिसत असून त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सारी तयारी करून अर्जदाखल करण्याची तयारी केली आहे.सुरूवातीला या गटात कमालीची शांतता पसरल्याचे दिसत असताना व निवडणूकीतून माघारी घेत असल्याचेही चर्चाही पुढे आली होती.पण सर्वपक्ष पुढारी एकत्रित येवून निवडणूकीच्या रिंगणात उतरत असल्याचे चित्र पुढे आले आहे.मात्र सुरूवातीला हो म्हणणार्‍यांनी ऐनवेळी मैदानातून माघारीचा मार्ग निवडल्याने विरोधकांनी उमेदवारांच्या नावा बाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसत आहे.