Thu, Apr 18, 2019 16:07होमपेज › Satara › ‘विश्‍वकर्मा’च्या करिअर मार्गदर्शनास प्रतिसाद 

‘विश्‍वकर्मा’च्या करिअर मार्गदर्शनास प्रतिसाद 

Published On: Apr 22 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 9:59PMकराड : प्रतिनिधी

पुणे येथील विश्‍वकर्मा विद्यापीठाच्या वतीने शनिवारी कराड येथे करिअर मार्गदर्शन मेळावा झाला. यास विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. राधाकृष्ण बटुले, प्रा. विवेक निंबोळकर यांनी करिअरच्या वाटा याबाबत मार्गदर्शन केले. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेसची माहिती नसते. त्यामुळे बारावीनंतर पुढे काय, हा प्रश्‍न विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या मनामध्येही असतो. याबाबतचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही तज्ज्ञांनी केले. 

काळाची गरज ओळखून विश्‍वकर्मा विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्यपूर्ण मनुष्यबळ निर्माण करणे, त्यासाठी लागणार्‍या अभ्यासक्रमांची निर्मिती करणे आणि ते राबविण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व त्यानुसार त्यांनी करिअरची नेमकी वाट कशी शोधावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

विश्‍वकर्मा विद्यापीठात विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात व्हीआयटी महाविद्यालय, विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी कार्यरत असून या दोन्ही संस्थांना शैक्षणिक स्वायत्तता मिळाली आहे. संशोधनाची जोड  असणारे नाविन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. विद्यापीठात आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन, कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, लॉ, ह्युमॅलिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस, जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी यासह 45 हून अधिक अभ्यासक्रमांचे पदवी, पदव्युत्तर, एम.फिल, पी.एचडी  पर्यंत शिक्षण दिले जाते. 

विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमधील नेमके कामकाज कसे चालते याविषयी माहिती मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर शैक्षणिक करार करण्यात आला आहे याची माहितीही विद्यार्थी व पालक यांना देण्यात आली. डिग्री हातात पडल्या पडल्या विद्यार्थ्याला नोकरीची संधी उपलब्ध होईल, त्या अनुषंगाने नवनवीन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. विश्‍वकर्मा विद्यापीठाच्या वेबसाईटवर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.   www.vupune.ac.in या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विवेक निंबोळकर 9890863122 व डॉ. राधाकृष्ण बटुले 9890611130 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

Tags : satara, satara news, Vishwakarma University, career guidance,