Wed, Nov 21, 2018 21:30होमपेज › Satara › 'लोकसंख्येच्या निकषावर आरक्षण द्या' (video)

'लोकसंख्येच्या निकषावर आरक्षण द्या' (video)

Published On: Aug 31 2018 4:47PM | Last Updated: Aug 31 2018 5:57PMकराड : प्रतिनिधी 

सरकारने २०११ साली जातिनिहाय जनगणना केली आहे. या जनगणनेनुसार प्रत्येक जातीची जेवढी लोकसंख्या असेल त्या प्रमाणात सरकारने आरक्षण दिले पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.

प्रवीण गायकवाड यांनी आज (शुक्रवार) दैनिक पुढारीच्या कराड कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी बोलताना आपले परखड मत व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ॲट्रॉसिटी कायद्याबाबत केंद्र सरकारने जी तत्परता दाखवली, त्याच तत्परतेने घटनेत बदल करावा असे मतही गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेलच. मात्र सद्यस्थितीत निर्माण झालेली देशातील घातक परिस्थिती असून सरकारने प्रत्येक जातीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे  अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.