Fri, Jul 19, 2019 18:35होमपेज › Satara › एनएतील अडथळे दूर, तत्काळ दाखले मिळणार

एनएतील अडथळे दूर, तत्काळ दाखले मिळणार

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:33PMकराड : प्रतिनिधी

ज्या भागाचा विकास आराखडा तयार झालेला आहे, त्या भागातील अकृषिक (एन.ए.) चे निकष पूर्ण करणार्‍या जमिनींचा सरकारी शुल्क भरल्यास तत्काळ एनए परवाने देण्याचा महत्वपूर्ण निर्णय डीमएनएच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतला असल्याची माहिती, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. क्रेडाई महाराष्ट्रचे राज्य अधिवेशन येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे झाले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष राजीव पारीख, सतीश मगर, श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, कराडचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  

चंद्रकांत पाटील म्हणाले, जमिनीच्या एनएसाठी अत्यंत क्‍लिष्ठ प्रक्रियेला लोकांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आता डीमएनए मध्ये जावून  स्वत:चा रहिवास सांगितला व चार्जेस भरले की त्याला त्वरीत परवाना  मिळणार आहे. आम्ही महसूलचा डीमएनए दौरा केला असून त्यामुळे एनएचा त्रास संपुष्ठात आणला आहे. असे अनेक निर्णय शासन घेत आहे. तसेच 1 मेला महाराष्ट्रातील  300 तालुक्यांतील 40 हजार गावांचा सातबारा ऑनलाईन करून तो डिजिटल सिग्‍नेचरसहित मिळणार आहे. उर्वरित 3 हजार गावांचे सातबारा नोंदी पूर्ण करण्याचे काम सुरू असून 1 जूनपर्यंत  हे काम पूर्ण केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण सर्व नकाशे डिजिटल केले जाणार आहेत. संपूर्ण राज्य डिजिटलायेशन केले जात आहेत. महाराष्ट्रातील महसूल विभागात एकही कागदाचा गठ्ठा दिसणार नाही. यापुढे कागद मिळत नाही, सापडत नाही अशी कारणे उरणार नाहीत.

1 कोटी 87 लाख  कागदे आतापर्यंत डिजिटलायझेन केली आहेत. या सरकारने स्वत:ला सहज उपलब्ध करून दिले आहे. देशात कोणाकडे गॅस नाही, पक्‍की घरे नाहीत, रोजगार नाही अशी परिस्थिती राहणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. 2022 पर्यंत 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. ती घरे स्वस्त असणार आहेत. बांधकाम  व्यावसायिकांना खासगी मालकांच्या जमिनी उपलब्ध करून देवून त्या असून स्वा. सैनिकांच्या कुटुंबांना भेट म्हणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणाला संप, मोर्चे, आंदोलने करण्याची संधी द्यायची नाही त्यातील एक निर्णय म्हणजे रेडिनेक्टर वाढणार नाही याचा असा निर्णय घेतला आहे. 

अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्रामध्ये सिक्‍किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्याबद्धल सर्वसामान्यांच्या मनात असणारे गैरसमज दूर करून विश्‍वासार्हता निर्माण करावी. बांधकाम व्यावसायिकांसंदर्भात समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे त्यांची विश्‍वासार्हता कमी झाली आहे. बांधकामातील तांत्रिक बाबी सर्वसामान्यांना समजवून सांगून त्यांना किफायतशीर किंमतीत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोयीस्कर घरे द्यावीत. कोणत्याही प्रकारे सर्वसामान्यांची  फसवणूक होता कामा नये. यावेळी त्यांनी बांधकाम व्यावसायितील अनेक अनुभव सांगून त्यातील बारकावे विषद केले. प्रास्ताविक राजेंद्र यादव यांनी केले. आभार मकरंद जाखलेकर यांनी मानले. यावेळी महाराष्ट्रातील  के्रडाईचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Tags : Satara, Remove,  obstacles, NA, get,  immediate, proofs