Wed, Apr 24, 2019 07:33होमपेज › Satara › सातारा : रिलायन्‍स विरोधात भाजप कार्यकर्ते रस्‍त्‍यावर

रिलायन्‍स विरोधात भाजप कार्यकर्ते रस्‍त्‍यावर

Published On: Apr 17 2018 2:28PM | Last Updated: Apr 17 2018 2:30PMलिंब : वार्ताहर

महामार्गाच्या सहपदरी करणातील राहिलेल्या त्रुटीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या सातारच्या पदाधिकाऱ्यांनी ढागेवाडी-लिंब येथील रिलायन्सच्या आयटीडी ऑफिसवर धरणे आंदोलन सुरू आहे. महामार्ग प्राधीकरणाकडून महामार्गा लगतची जनता  वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गाची कामे पूर्ण करा अन्यथा टोल वसुली बंद करा अशी मागणी करण्यात येत आहे

भाजपच्या अमोल सणस यांच्यासह विरमाडे, आनेवाडी, खेड, लिंब, बदेवाडी, पाचवड, भुईंज, नागेवाडीसह महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थांसह महिला उपस्थित आहेत. यावेळी अमोल सणस यांनी महामार्गावरील पाचवड येथील झालेला निकृष्ट दर्जाचा उड्डाण पूल , विरमाडे फाट्यावरील कमी उंचीचा पुलामुळे ग्रामस्थांना होणारा त्रास, रिलायन्सने टोलनाक्यावरील नव्याने बनविलेल्या वे ब्रिजमुळे लोकांना होणारा त्रास,  महामार्गावरील तीन पदरी ऐवजी बनविलेले दोन पदरी पूल, यासह महामार्गालगतच्या ग्रामस्थांना सहा पदरी कारणामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या, म्हसवे येथील पूल तोडून नव्याने पूल बांधण्याचे कामाबाबत सूचना देण्यात येऊनही रिलायन्‍सकडून या पुलाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रोडच्या लेन व्यवस्थित नाहीत, महामार्गाची सर्व कामे व्यवस्थित पूर्ण करावीत अन्यथा टोल वसुली बंद करा अशी मागणी करण्यात येत आहे. शासनाने म्हसवे येथील पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यास सांगण्यात येऊनसुद्धा त्या ठिकाणी आज अखेर आयटीडी कंपनीने कोणतेही पाऊल उचलले नाही.

महामार्गावरील अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या मृत्यूस itd कंपनीस जबाबधार ठरत त्यांच्यावर 304 गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हि यावेळी करण्यात आली.

यावेळी आयटीडीच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सणस यांनी महामार्गाची कामे व्यवस्थित पूर्ण करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यायाला लावू नका असा इशारा देण्यात आला. दरम्यान सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. प्रदीप जाधव यांच्या मध्यस्थीने आयटीडीच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करून कामे पूर्ण करू असे लेखी मागण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.