Mon, Mar 25, 2019 03:17
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › अधिकार्‍यांना कायमस्वरूपी फोन नंबर द्या

अधिकार्‍यांना कायमस्वरूपी फोन नंबर द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तारळे : एकनाथ माळी

अनेक शासकीय कार्यालयात  अधिकारी अथवा कर्मचारी कामाच्या वेळी जागेवर सापडेल, याची खात्री नसल्याने लोकांना तातडीची माहिती,नैसर्गिक आपत्ती,अथवा तक्रार  करता येत नाही.तसेच अधिकार्‍यांच्या बदल्यानंतर नविन अधिकार्‍यांचा नंबर मिळवताना दमछाक होते. त्यामुळे विज वितरणकडून ज्या पद्धतीने कर्मचार्‍यांना कायमचा नंबर दिला आहे त्या धर्तीवर सर्व खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी नंबर वापरण्याची सक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पाटण तालुका दुर्गम डोंगरी म्हणून ओळखला जातो. शेकडो गावे ,वाड्या ,वस्त्या डोंगर कपार्‍यात वसली आहेत.अनेक गावात अजूनही मोबाईलची रेंज पोहचली नाही.अशा दुर्गम भागात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्जंट काही माहिती द्यायची  अथवा घ्यायची  असेल तर संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील लोकांना कायमस्वरुपी तलाठी, ग्रामसेवक,मंडलाधिकारी ,वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी,पंचायत समिती,तहसिलदार कचेरी, बांधकामासंबंधित कार्यालये ,जिल्हा परिषदेतील विविध कार्यालये  ते जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयाशी विविध कामासाठी संपर्क ठेवावा लागतो.बहुतांशी ठिकाणी लँडलाईन फोनवरून माहिती अथवा तक्रार करावी लागते.बरेच वेळा कामानिमीत्त शासकीय अधिकारी बाहेर असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचता येत नसल्याने बांधकाम संबंधात ठेकेदार आपला कार्यभार उरकून घेतात.अथवा काही महत्वाची माहिती मिळत नाही.

तालुका अथवा जिल्ह्याच्या कार्यालयात गेल्यावर दिवसभराच्या कामाचा खोळंबा व अर्थिक फटका लोकांना सहन करावा लागतो.पण प्रत्येकाला संबंधित विभागातील अधिकारी जागेवर भेटेल याची खात्री नसते. त्यामुळे ताटकळत बसायचे  किंवा दुसर्‍या दिवशी पुन्हा कार्यालयाचा दरवाजा ठोठावायचा.

दुसर्‍या दिवशी अधिकारी जागेवर भेटल्यावर काल येवून गेल्याचे सांगितल्यावर ‘आम्हाला एवढेच काम आहे का’ म्हणत लोकांना शहाणपणाचे डोस पाजले जातात. अधिकारी जागेवर न सापडल्यास संबंधित कार्यालयात टेबलवर चौकशी केल्यास त्यांच्याकडूनही अधिकार्‍याचा मोबाईल नंबर दिला जात नाही .त्यामुळे लोकांची फारच दमछाक होते. त्यामुळे शासनाने आता प्रत्येक खातेनिहाय गावापासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकार्‍यांना त्या त्या टेबलला कायमस्वरुपी  नंबर द्यावा.


  •