Thu, Jun 20, 2019 21:33होमपेज › Satara › ‘कृषी’कडून परवाना रद्दपेक्षा निलंबनावरच भर

‘कृषी’कडून परवाना रद्दपेक्षा निलंबनावरच भर

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 11 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी औषध-बियाणे वितरक व विक्रेत्या कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यावेळी जिल्ह्यातील  38 कृषी सेवा केंद्रांवर विविध उणिवा, त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्रांचा परवाना तात्पुरता निलंबित केला होता. गंभीर बाबीतही कठोर कारवाई झाली नाही. अशावेळी परवाने रद्द करण्याऐवजी निलंबित करण्यात आले. त्यामुळे या कारवाईबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे.

कृषी विभागाच्या भरारी पथकाने बियाणे, औषधे विक्री करणार्‍या कृषी सेवा केंद्रांची नुकतीच तपासणी केली.  या तपासणीत साठा व भाव फलक जाहीर  न करणे, बियाणे खरेदी बिले नसल्याने जावली तालुक्यात कृषीरत्न अ‍ॅग्रो हायटेक, कुडाळ या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. काही कृषी सेवा केंद्रांकडून किटकनाशक नियंत्रण आदेश व किटकनाशक नियमांचे उल्‍लंघनदेखील झाले. त्यामध्ये  स्टेप्टोसायक्लिन उगमपत्र नसल्याने चौंडेश्‍वरी अ‍ॅग्रो एजन्सीज नागठाणे (ता. सातारा); कराड तालुक्यातील गणेश एजन्सीज, श्रीराम अ‍ॅग्रो सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस नारायणवाडी (पाचवड फाटा), श्रीराम कृषी सेवा केंद्र, सुपर मार्केट शनिवार पेठ, सर्वोदय कृषी सेवा केंद्र उंब्रज, मे. शिंदे आणि कंपनी ओंड, कृषीभूषण, गाळा नं.3 धर्मवीर संभाजी भाजी मार्केट, मे. राहूल कृषी उद्योग केंद्र शनिवार पेठ; पांडुरंग कृषी उद्योग मेन रोड (कोरेगाव),  जाधव अ‍ॅग्रो एजन्सीज महात्मा फुले, शॉपिंग सेंटर गाळा नं. अ-6 (फलटण); सिध्दीविनायक अ‍ॅग्रो एजन्सीज, भिलार (ता. महाळेश्‍वर)  या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई झाली. 

अनुदानित खत विक्री करताना पॉज मशिनचा वापर करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा खताची विक्री करत असताना संबंधित शेतकर्‍याकडून सात-बारा व आधार कार्ड क्रमांक घेणे बंधनकारक आहे. बरेच वितरक ही प्रक्रिया पार पाडून खतांची विक्री करत नाहीत. परिणामी शेेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पॉझ मशिनमुळे संबंधित दुकानदाराने खरेदी-विक्री केलेल्या खताचा हिशेब राहणार आहे. मात्र, या गोष्टीला बगल देण्यासाठी पॉज मशिन वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  यातून साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याचीची दाट शक्यता असते. पॉज मशिन न वापरणार्‍या 28 कृषी सेवा केंद्रांवरही कारवाई झाली.  त्यामध्ये कराड तालुक्यात यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना (वाठार), श्रध्दा फर्टिलायझर ओंड या केंद्रावर कारवाई झाली.

याच तालुक्यातील आदिनाथ कृषी सेवा केंद्र (घारेवाडी), कृषीमित्र कृषी सेवा केंद्र (विंग), लक्ष्मी कृषी सेवा केंद्र (येरवळे), साई अ‍ॅग्रो एजन्सीज (उंब्रज),  ऋतु अ‍ॅग्रो एजन्सीज (मसूर) याठिकाणी दोनवेळा कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील कृषी पंढरी (लोणंद), श्री गणेश अ‍ॅग्रो एजन्सी (अंदोरी), श्रीनाथ अ‍ॅग्रोटेडर्स (खंडाळा); जावली तालुक्यातील कृषीरत्न अ‍ॅग्रो हायटेक (कुडाळ) लक्ष्मी कृषी सेवा केंद्र (केळघर), योगेश बजरंग पार्टे (केळघर); खटाव तालुक्यातील अथर्व अ‍ॅग्रो एजन्सीज (शेनवडी), हांगे अ‍ॅग्रो केअर सेंटर (पुसेसावळी), लक्ष्मी कृषी सेवा केंद्र  (कलेढोण), राज ट्रेडर्स (बुध), शेतकरी कृषी सेवा केंद्र (विसापूर), श्रीविजय अ‍ॅग्रो सर्व्हिेसेस (भोसरे), श्री स्वामी समर्थ अ‍ॅग्रो (डिस्कळ), मे. विघ्नेश कृषी उद्योग (काटकरवाडी); जय हनुमान कृषी सेवा केंद्र (बोरगाव) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.  यापैकी काहीजणांकडून गंभीर बाबी घडल्या आहेत. त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याऐवजी काही महिन्यांपुरते तात्पुरता परवाना निलंबित करण्यात आले. त्यामुळे या कारवाईकडे संशयाने पाहिले जात आहे.  खते, औषधे, बियाणांमध्ये शेतकर्‍यांना फसवणार्‍या व लुबाडणार्‍या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.