Fri, Jul 19, 2019 01:35होमपेज › Satara › वाहनचालकांकडून १ कोटीचा दंड वसूल

वाहनचालकांकडून १ कोटीचा दंड वसूल

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 9:10PMसातारा : प्रतिनिधी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत  सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतुकीविरूध्द मोहीम उघडण्यात आली होती. त्यामध्ये 4 हजार 576 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 1 हजार 144 वाहन चालकांनी शासकीय नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून कारवाईपोटी सुमारे 1 कोटी रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 अखेर जिल्ह्यात विविध अवैध प्रवासी वाहतुकीविरूध्द मोहीम उघडण्यात आली  होती.  हॉर्न तपासणी मोहिमेत जिल्ह्यात 2 हजार 888  वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 722 वाहने दोषी आढळून आली. क्रॅशगार्ड अंतर्गंत 50 वाहनांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 12 वाहने दोषी आढळले. त्यांच्याकडून 7 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

रात्र तपासणी मोहिमेत 1 हजार 104 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 201 वाहने दोषी आढळून आली.  त्यांच्याकडून दंडापोटी 5 लाख 70 हजार 600 रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली. 121 नवीन अ‍ॅटा ेरिक्षांना परवाने देण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या 18 विधवा महिलांना रिक्षाचे  नवीन परवाने देण्यात आले.

क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणार्‍या 3 हजार 288 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 822 वाहने दोषी आढळले. तर 690 वाहने जप्त करण्यात आली होती. त्यांच्याकडून 1 कोटी 31 लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. एका वायुवेग पथकामार्फत ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली.  त्यामध्ये 2 कोटी 39 लाख रुपये  दंड वसूल करण्यात आला तर 6 कोटी 3 लाख रुपये कर वसूल करण्यात आला. आकर्षक नंबरसाठी 5 हजार 230 वाहनांमधून 3 कोटी 71 रूपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे धायगुडे यांनी सांगितले. 1 कोटी 33 लाख रुपयांची पर्यावरण कर वसुली करण्यात आली. व्यवसाय कर वसुली 1 कोटी 12 लाख रुपये करण्यात आली. महसूल वसुली 118 कोटी 98 लाख रुपये झाली.

वर्षभरात नवीन वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये  मोटारसायकल 39 हजार 756, कार व जीप 5 हजार 361, टॅक्सी 248, अ‍ॅटोरिक्षा 377, प्रवासी वाहने 111, मालवाहू वाहन 2 हजार 126, इतर वाहने 2 हजार 464 असे मिळून 50 हजार 443  वाहनांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा 5 हजार 416 वाहनांची नव्याने भर पडली आहे.

 

Tags : satara, satara news, rto, Vehicle drivers, fine, Recovery,