Mon, Jun 17, 2019 15:01होमपेज › Satara › सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव सोहळा

सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव सोहळा

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:32PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात व इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील सिद्धहस्त योगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त रथ पूजन सोहळा, श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन उद्घाटन रविवारी (दि. 17) सकाळी 9 वाजता आहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, सहपालकमंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल, अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. 

रथोत्सव सोहळ्यास  खा. श्री. छ.  उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. दीपक चव्हाण, आ. आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्‍वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव आदी उपस्थित राहणार आहेत. 

पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीची विधीवत पूजा, अभिषेक व आरती मठाधिपती सुंदरगिरी महाराज,  व ट्रस्टच्या पदाधिकर्‍यांच्या  हस्ते होणार आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची मानाच्या रथामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यानंतर रथयात्रेस सकाळी 9.30 वा. सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी खेळण्याची दुकाने, सौंदर्यप्रसाधने, पाळणे, सिनेमागृह, मिठाई, हॉटेल, विविध दुकाने मोठ्या थाटामाटात सजलेली आहेत.