Thu, Nov 15, 2018 12:36होमपेज › Satara › मतिमंद महिलेवर बलात्कार

मतिमंद महिलेवर बलात्कार

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:23PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर

चिलेवाडी, ता. कोरेगाव हे माहेर असलेल्या मतिमंद विधवा महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भाडळे, ता.कोरेगाव येथील संशयित राजेंद्र बाबू चव्हाण याच्यावर वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला ही मतीमंद आहे. बोधेवाडी ता.कोरेगाव हे तिचे सासर आहे.  पती निधनानंतर ती भाडळे, नागेवाडी, बोधेवाडी परिसरात फिरुन रहात होती. दोन महिन्यांपूर्वी ती पुन्हा चिलेवाडी येथे गेल्यावर ती गर्भवती असल्याचा संशय कुटुंबियांना आल्याने तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता तिने भाडळे येथील राजेंद्र बाबू चव्हाण याने जबरदस्ती केल्याचे सांगितले.

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी चव्हाण याच्या शोधार्थ पोलीस पथक पुणे येथे रवाना झाले आहे. अधिक तपास सपोनि मयूर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत चिंचकर करत आहेत.