Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Satara › उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा 

Published On: Mar 23 2018 11:41AM | Last Updated: Mar 23 2018 11:41AMसातारा: प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या ४-५ महिन्यापासून याबाबत संबंधित महिला पोलिसात तक्रार देत होती. पण त्याबाबत टाळाटाळ होत होती. मात्र संबंधित महिलेने आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रात्री उशिरा भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.