Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Satara › सातारा : बलात्कार प्रकरणी आईसह मुलाला शिक्षा

बलात्कारी युवकाला ७ वर्षे शिक्षा

Published On: Apr 26 2018 4:07PM | Last Updated: Apr 26 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लग्‍नाच्या आमिषाने बलात्कार तसेच फसवणूकही  केल्याप्रकरणी प्रशांत एकनाथ घोरपडे (वय 31) याला 7 वर्षांची सक्‍तमजुरी तर त्या मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी आरोपीची आई शोभा एकनाथ घोरपडे (वय 52, दोघे रा. पिराचीवाडी) यांना 3 वर्षांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7  पी. व्ही. घुले यांनी ही शिक्षा दिली असून पीडितेला 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर 19 व 25 जून 2011 रोजी प्रशांत घोरपडे याने बलात्कार केला होता. याबाबत दोन्ही कुटुंबांची बैठक झाल्यानंतर प्रशांत याने त्या मुलीशी लग्‍न करतो. आता गर्भपात करा, असे लेखी लिहून दिले. गर्भपात करण्यासाठी आरोपीची आई शोभा घोरपडे यांनी तगादा लावल्याने व नंतर लग्न करतो असे लिहून दिल्याने त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला. काही महिने गेल्यानंतर मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्नाबाबत विचारले असता मुलाने विवाहासाठी नकार दिला. अखेर त्या पिडीत कुटुंबियांनी वाई पोलिस ठाण्यात धाव घेवून 23 डिसेंबर 2011 रोजी तक्रार दिली.पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि श्रीकांत डोंगरे-पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर सरकार पक्षच्यावतीने अ‍ॅड. मंजुषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला. सुरुवातीला हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधिश-2 वर्षा मोहिते यांच्याकडे होते. मात्र त्यांची बदली झाल्याने पुढे हे प्रकरण न्या.पी.व्ही.घुले यांच्यासमोर आले. बचाव व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आई व मुलाला शिक्षा सुनावली.

दरम्यान, प्रशांत घोरपडे हा उच्चशिक्षित युवक असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी उशीरा न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर पिडीत कुटुंबाने न्यायव्यवस्था, पोलीस, वकील या सर्वांचे आभार मानले आहेत.

Tags : Rape Case,  Crime, 7 Years Punishment, Court,  Abortion For Girl,Satara