Thu, Jul 18, 2019 04:54होमपेज › Satara › भीमा कोरेगाव शांतता अबाधित ठेवा : रामराजे

भीमा कोरेगाव शांतता अबाधित ठेवा : रामराजे

Published On: Jan 02 2018 10:45PM | Last Updated: Jan 02 2018 10:44PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

पुरोगामी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. राज्यातील जनता शांतताप्रिय आहे. ही शांतता अबाधित ठेवा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. 

राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या जातीय तणावाच्या पार्श्‍वभूमीवर रामराजे निंबाळकर यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. माथी भडकावून जातीय तेढ वाढणार नाही, याची काळजी जनतेने घेतली पाहिजे. महापुरुषांनी आपल्याला जातीयवाद शिकवला नाही. जाती-जातीतील सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. त्यामुळे कुणीही कायदा हातात घेवू नये. सामाजिक संघटनांनीही शांततेचा मार्ग अवलंबावा, असे आवाहनही रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.