Wed, Jul 17, 2019 18:48होमपेज › Satara › ...आता मला दिल्लीला जावेच लागेल : रामराजे

...आता मला दिल्लीला जावेच लागेल : रामराजे

Published On: Sep 02 2018 3:31PM | Last Updated: Sep 02 2018 3:31PMफलटण : प्रतिनिधी

रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद काही नवीन नाही. हे दोघेंही एकमेकांविरोधात बोलण्याची एकही संधी दवडत नाहीत. नुकत्याच एका झालेल्या कार्यक्रमात त्यांनी खासदार उदयनराजेंकडून आपल्या जीविताला धोका असल्याचे मत व्यक्त केले. तसेच जिल्ह्याचा विकास म्हणावा तितका झाला नसल्याने मला दिल्लीला जावेच लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उदयनराजे व रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे  हेवी वेट नेते आहेत. मात्र या दोघांनी गेली अनेक दिवस एकमेकावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटण मध्ये येऊन तुमच्या घरी यायला सुद्धा वेळ लागणार नाही, असा जणू रामराजेंना दमच दिला होता. यावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे जाऊन मी कोणत्याही गोष्टी विसरलो नाही वेळ आलेवर शिकार करणारच, असे ठणकावून सांगितले होते.

तर, सध्या उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीचा कोणच नेता अथवा कार्यकर्ता खासदारकी लढवा असे म्हणत नाही. मात्र इतर सर्वच पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्यास तयार आहेत. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 'वेट अँड वॉच' च्या भूमिका पार पाडत आहेत. मात्र विधानपरिषद सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र उघडपणे भूमिका घेतल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.