Thu, Feb 21, 2019 17:12होमपेज › Satara › रामराजे निंबाळकर यांना फर्ग्युसीयन्स पुरस्कार जाहीर

रामराजे निंबाळकर यांना फर्ग्युसीयन्स पुरस्कार जाहीर

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 1:51AMसातारा : प्रतिनिधी

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा फर्ग्युसीयन्स गौरव पुरस्कार विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांना जाहीर झाला असून उद्या दि. 31 रोजी एका खास कार्यक्रमाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे वितरण केले जाणार आहे. 

फर्ग्युसन महाविद्यालयाचा हा पुरस्कार प्रतिष्ठेचा म्हणून समजला जातो. ना. रामराजे यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील उल्‍लेखनीय योगदानाची दखल घेवून महाविद्यालयाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ना. रामराजे हे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. बुधवार 31 रोजी  सायंकाळी 5.30 वाजता वरिष्ठ उपकुलगुरु प्रा. राम ताकवले आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रा. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत  ना. रामराजे यांना पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.

महाविद्यालयाच्या  के. फिरोदिया अ‍ॅडिटोरियम, फर्ग्युसन  कॉलेज कॅम्पस येथे हा सोहळा संपन्‍न होत आहे. यावेळी फर्ग्युसन  अभिमान पुरस्काराने एपीएमसीचे डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, अभिनेत्री सुहासिनी जोशी,  साहित्यिक अनिल अवचट यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अ‍ॅड. विजय सावंत, प्रेसिडेंट वाय. डी. मेहेंदळे, व्हा. प्रेसिडेंट टी.बी. बहिराट, एअर मार्शल बी. एन. गोखले यांनी केले आहे.