Wed, May 22, 2019 16:15होमपेज › Satara › ‘अण्णा हजारे चांगले, पण भोवतीची माणसे अयोग्य’(Video)

‘अण्णा हजारे चांगले, पण भोवतीची माणसे अयोग्य’(Video)

Published On: Apr 14 2018 10:49AM | Last Updated: Apr 14 2018 10:49AMकराड : प्रतिनिधी 

आठ वर्षांपूर्वी आपणच अण्णा हजारे यांना प्रथम उत्तर भारतात ओळख निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत, पण त्यांच्यासह आंदोलनाचा फायदा घेत अरविंद केजरीवाल यांच्यासह काहीजण राजकारणात गेले,असे स्वामी रामदेव बाबा यांनी कराडात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. चार वर्षापूर्वीच्या आंदोलनामुळे काही नेते झाले. त्यामुळेच आपण देशहितासाठी आंदोलन करतो, कोणी नेता व्हावा म्हणून कधीच आंदोलन करत नाही. त्यामुळेच आपण यावर्षी अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनास गेलो नाही, पाठिंबा दिला नाही असेही ते म्हणाले. 

डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान कराड, पंतजली योग समिती, महिला पंतजंली योग समिती व भारत स्वाभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर योग चिकित्सा व तीन दिवसीय ध्यान शिबिरास प्रारंभ झाला. 

पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा म्हणाले, आपण अण्णांना त्यांच्या भोवती असणार्‍या लोकांचे अवलोकन करण्यास सांगितले असून अण्णा ते करत आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांचे सहकारी चांगले नव्हते, असे सांगत रामदेव बाबा यांनी  केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर यावेळी टीका केली आहे.