Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Satara › राजेंद्र सुळ ठरला किसन वीर चषकाचा मानकरी

राजेंद्र सुळ ठरला किसन वीर चषकाचा मानकरी

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:09PMभुईंज : वार्ताहर

किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील राज्यस्तरीय कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात 86 किलो वजन गटात राजेंद्र सुळ किसन वीर चषकाचा मानकरी ठरला अमोल मुंढे उपविजेता ठरला. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, नरेंद्र सोपल, श्रीपती खंचनाळे, दिनानाथ सिंह, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव व संचालकांच्या हस्ते 75 हजार रूपये व चांदीची गदा देऊन राजेंद्र सुळला सन्मानित करण्यात आले. 

श्री माणकाईदेवी यात्रेनिमित्त जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्षेत्रातील विविध बारा वजन गटातील प्रथम क्रमांकाचे 12 पैलवान कारखान्याचे मानधनधारक पैलवान ठरले. 86 किलो वजन गटात अंतिम लढत सातारा तालीम संघाचा राजेंद्र सुळ आणि पुण्याच्या मामासाहेब मोहोळ तालमीचा अमोल मुंढे यांच्यामध्ये झाली. राजेंद्र सुळने आक्रमक कुस्ती करत दहा विरूद्ध  चार गुणांनी मुंढेवर मात केली. पुण्यातील अनिकेत खोपडे आणि इचलकरंजी येथील विक्रम शेटे हे किसन वीर चषक गटात अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे विजेते ठरले. त्यांना अनुक्रमे 25 व 15 हजार रूपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. 76 किलो वजन गटात अजित शेळके, दिनेश मोकाशी, किरण बरकडे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय  क्रमांकाचे तर 65 ते 70 किलो वजन गटात अक्षय हिरगुडे, सुमीत गुजर आणि स्वप्निल पाटील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. 

विविध वजन गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी याप्रमाणे 76 किलो- अक्षय साबळे, संकेत चव्हाण (कारखाना), सागर भुजबळ  70 किलो- अविनाश लोखंडे , सुमित  मरगजे, साहिल कणसे 65 किलो- आकाश माने, अक्षय भोसले (कारखाना),चेतन मरगजे,  61 किलो-गणेश झांजुर्णे,  गणेश शिंदे , रोहित मालुसरे 57 किलो - प्रशांत शिंदे (कारखाना), प्रद्युम कणसे, प्रणय चव्हाण 54 किलो- अक्षय चव्हाण, संदिप जाधव, समाधान बोभारे, 50 किलो- शिवराज कणसे, प्रज्वल सकुंडे, अभिजीत साबळे, 46 किलो- सत्यजीत फाळके, सौरभ निकम, पृथ्वीराज वाडकर  42 किलो- गौरव लिमण, किरण कीर्दत, ओमकार फडतरे, 38 किलो-प्रथमेश घाडगे, अजिंक्य जगदाळे, यश जाधव, 35 किलो-निखिल मांढरे, अभिजीत सावंत, रोहित मोरे, 32 किलो- स्वयंम कणसेे, ओम यादव, साहिल मांढरे.

नरेंद्र सोपल म्हणाले, किसन वीर साखर कारखान्याच्या नेतृत्वाने लाल मातीतील कुस्ती जीवंत ठेवली असून कारखान्याने ही परंपरा यापुढेही सुरू ठेवावी. दिनानाथ सिंह यांनी मनोगत व्यक्‍त केले.
पंच  म्हणून शिवाजीराव पाचपुते, मधुकर शिंदे, दिलीप पवार, अंकुश वरखडे, नवनाथ ढमाळ,आदींनी काम पाहिले. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकराव गाढवे, सर्व संचालक परिसरातील नागरिक उपस्थित होते.