Tue, Nov 13, 2018 03:45होमपेज › Satara › आर्थिक फसवणूकप्रकरणी राजस्थानच्या दोघांना अटक

आर्थिक फसवणूकप्रकरणी राजस्थानच्या दोघांना अटक

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील व्यापार्‍यास पाच लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या राजस्थान येथील दोघांना सोमवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, कमलेश देसाई यांचे शाहू स्टेडियमच्या व्यापारी संकुलात दुकान आहे. राजस्थान येथील किसनगडमध्ये असणार्‍या आर. के. मार्बल या कंपनीचा व्यवस्थापक संजय जैन याच्याशी देसाई यांची ओळख होती. मे महिन्यात देसाई यांना फोन करणार्‍याने स्वत:चे नाव संजय जैन बोलत असून ‘अहमदाबाद येथे 5 लाख रुपये हवे असून ते पाठवून द्या, दोन तासांत माझा माणूस तुमच्या दुकानात तेवढी रक्‍कम आणून देईल’, असे त्याने सांगितले.     

यानुसार देसाई यांनी मध्यस्थाच्या माध्यमातून 5 लाख रुपये राजूभाई नावाच्या व्यक्तीला दिले.पैसे देवून बरेच दिवस झाले तरी ते परत न मिळाल्याने देसाई यांनी संजय जैन यांच्यांशी संपर्क साधला. जैन यांनी अशाप्रकारे कधीही पैसे मागितले नसल्याचे तसेच ते मिळाले नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कमलेश थनारामजी देसाई (रा. सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत राजूसिंग उर्फ करणसिंग जोतीसिंग राजपुत (वय 26, रा. जालोर, राजस्थान) आणि दिपसिंग अर्जुनसिंग राठोड (वय 22, रा. जालोर) या दोघांना अटक केली.