Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Satara › राज ठाकरेंनी लुटला खरेदीचा आनंद

राज ठाकरेंनी लुटला खरेदीचा आनंद

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:07AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह  महाबळेश्‍वर येथे विश्रांतीसाठी दाखल झाले असून सोमवारी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह बाजारपेठेत फेरफटका मारला व खरेदीचा आनंद लुटला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून नुकतेच ते कोकणचा दौरा आटोपून महाडमार्गे महाबळेश्वरला रविवारी दुपारी विश्रांतीसाठी दाखल झाले. ते चार दिवस महाबळेश्‍वर मुक्‍कामी असून त्यांचा हा दौरा पूर्णपणे खासगी असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे यांच्यासह ‘मनसे’चे नेते नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, सिनेअभिनेते विनय येडेकर व इतर कुटुंबियांसह  महाबळेश्‍वरमधील मुख्य सुभाष चौकात त्यांचे आगमन झाले. तेथून ते चालत महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत आले. बाजारपेठेतून  त्यांनी शिवाजी चौकापर्यंत फेरफटका मारला. यावेळी बाजारपेठेत गर्दी उसळली. जागोजागी पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिकांनी राज  ठाकरे यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेतली. राज ठाकरेंनीदेखील प्रत्येकाशी हस्तांदोलन करीत फोटोला पोज दिली. दरम्यान, मुख्य बाजारपेठेतून दुपारी ते हॉटेलकडे रवाना झाले.