Thu, Nov 15, 2018 14:33होमपेज › Satara › राज ठाकरे क्षेत्र महाबळेश्‍वर चरणी

राज ठाकरे क्षेत्र महाबळेश्‍वर चरणी

Published On: May 31 2018 1:47AM | Last Updated: May 31 2018 1:47AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आपल्या कुटुंबीयांसमवेत श्री क्षेत्रमहाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध स्वयंभू शिवलिंग मंदिरास भेट देत सपत्निक पूजा अर्चा केली. सामान्य भक्‍तांप्रमाणेच त्यांनी अर्धा तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

राज ठाकरे सध्या विश्रांतीसाठी चार दिवसांच्या महाबळेश्‍वर दौर्‍यावर आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी बाजारपेठेजवळ असलेल्या   उंच विल्सन पॉईंट या प्रेक्षणीय स्थळावर फेरफटका मारला तर दुपारी महाबळेश्‍वरमधील प्रसिद्ध श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. ते आले त्यावेळी श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. त्यांना व्हिआयपी दर्शनाची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी यास नम्रपणे नकार देत रांगेत उभे राहूनच दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे उपस्थित भक्तांसह स्थानिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. त्यांनी श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंगाची सपत्निक पूजा अर्चा केली. त्यांच्या समवेत पत्नी शर्मिला ठाकरे, कुटुंबातील सदस्यांसह मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिनेते विनय येडेकर आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र महाबळेश्‍वर ग्रामस्थांच्यावतीने राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी बाबुदादा कात्रट, सरपंच सारिका पुजारी, प्रदीप कात्रट, राजू पुजारी, जीवन महाबळेश्‍वरकर, प्रशांत कात्रट आदी उपस्थित होते.