Mon, Aug 19, 2019 01:16होमपेज › Satara › चिमुकल्यांनी अनुभवला अपघाताचा थरार

चिमुकल्यांनी अनुभवला अपघाताचा थरार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुसेसावळी : वार्ताहर

मंगळवार दि. 27...वेळ दुपारी अडीचची...रखरखते ऊन...अन् विनाचालक स्कूल बसचा सुमारे 50 फुटाचा प्रवास...  चिमुकल्यांचा आरडाओरडा... शेवटी बस नाल्यात... पोलिस, ग्रामस्थांची मदत व दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरुप बचावले. पुसेसावळी येथील ही घटना.शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेली ही स्कूल बसचालकाने काही कारणास्तव रस्त्याकडेला उभी केली व तो बाहेर

आला. अन् काय घडले कोणास ठावूक. ही बस अचानक सुमारे 50 फूट पुढे जाऊन गटारात गेली. चिमुकल्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी व पोलिस शिवाजी खाडे, चंद्रकांत खाडे यांनी धावाधाव करुन आतील सर्व भेदरलेल्या अवस्थेतील चिमुकल्यांना तातडीने सुखरुपरित्या बाहेर काढले.जेसीबीच्या सहाय्याने गटारात गेलेली बस बाहेर काढण्यात आली
 

 

tags : Puyesavalli,news,School,bus,accident,

 


  •