Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Satara › पुसेगावला गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन 

पुसेगावला गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन 

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 11:18PMखटाव : प्रतिनिधी 

शिवजयंती उत्सव समिती पुसेगावच्या वतीने येथील श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन येथे भरवण्यात आलेल्या  जागर इतिहासाचा, गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

गडकिल्ले छायाचित्र  प्रदर्शनाचे उदघाटन  श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सरपंच दीपाली मुळे, विश्‍वस्त रणधीरशेठ जाधव, विश्‍वस्त प्रताप जाधव, आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  प्रदर्शनात  जागर इतिहासाचा या ग्रुपने काढलेली शिवनेरीपासून जिंजीपर्यंतची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे आर्ट गॅलरी  उभी करून  लावण्यात आली होती.  छ.  शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाचे अभ्यासक अनिकेत वाघ यांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिली.  बाळासाहेब खटावकर यांनी  शिवकालीन इतिहासाचे  मार्गदर्शन केले. प्रदर्शनादरम्यान  हिंदवी स्वराज्यात गडकिल्ल्यांचे महत्व या विषयावर अनिकेत वाघ, जे व्ही  जाधव यांची व्याख्याने झाली.              

प्रदर्शनास श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळा,  डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडियम स्कूल,  श्री हनुमानगिरी हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज,  इंदिरा गांधी कन्या शाळा,  पोद्दार इंग्लिश मीडियम  स्कूल, सर्व आंगणवाडया, श्री सेवागिरी विद्यालय, कला, वाणिज्य महाविद्यालय, शासकीय विद्यानिकेतन,  जि.प. शाळा, पब्लिक स्कूल,  जि. प. भवानी नगर शाळा , टी. सी . कॉलेज बारामती, जहांगीर हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, नागरिक, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी,  युवकांनी प्रदर्शनास भेट  दिली. हे प्रदर्शन ऐतिहासिक होते त्यामुळे ते पाहण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.