Fri, Nov 16, 2018 08:43होमपेज › Satara › खासदार शेट्टींची भूमिका योग्य; बळीराजा संघटनेचा पाठिंबा

शेट्टींची भूमिका योग्य; बळीराजा संघटनेचा पाठिंबा

Published On: Jul 19 2018 12:29PM | Last Updated: Jul 19 2018 2:57PMकराड :  प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) तालुक्यात दूध बंद आंदोलनाला चौथ्या दिवशी बळीराजा संघटने पाठिंबा दिला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्याने बाजूला गेलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेनेही स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कराडसह पश्चिम महाराष्ट्रात दूध बंद आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील एकाही शेतकऱ्याने दूध डेअरीस घालू नये, असे आवाहन करत राजू शेट्टी यांची सध्याची भूमिका योग्यच आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांनी ही भूमिका कायम ठेवत आंदोलन मागे घेऊ नये. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता शासन केवळ आश्वासने देते, त्यामुळे आश्वासनानंतर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच रहावे, अशी भूमिका बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी "दै. पुढारी'शी बोलताना जाहीर केली आहे.

मुंबईला एक थेंब दुधाचा पुरवठा झाला नाही पाहिजे, असे सांगत आज काही शेतकरी आंदोलनात सहभागी होत नाहीत. ते दूध डेअरीला घालत आहेत. मात्र केवळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच जादा दर मिळणार आहे असे नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. याशिवाय परराज्यातून आपल्या राज्यात येणारे दूध  पूर्णपणे बंद करून शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रूपये अनुदान दिलेच पाहिजे, अशी मागणीही पंजाबराव पाटील यांनी केली आहे.