Mon, Aug 19, 2019 00:54होमपेज › Satara › पुणे ‘एटीएस’चा सातार्‍यात छापा

पुणे ‘एटीएस’चा सातार्‍यात छापा

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:40AMसातारा : प्रतिनिधी

नालासोपारा, मुंबई येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्यानंतर या प्रकरणातील सातारचा संशयित सुधन्वा गोंधळेकर याच्या घरावर मंगळवारी सायंकाळी उशिरा पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) छापा टाकला असून उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. करंजे येथील सुधन्वाच्या घराची झडती घेऊन त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी झाल्याचे वृत्त आहेे.

शुक्रवारी नालासोपारा येथे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असणारा वैभव राऊत याच्या घरी मुंबई एटीएसने छापा टाकल्यानंतर गावठी बॉम्बसह बॉम्ब बनवणारे साहित्य साडपल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली. एटीएस पोलिसांनी वैभव याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यात सुधन्वा गोंधळेकर (मूळ  रा. करंजे, सध्या रा. पुणे) याचे नाव समोर आलेे. सुधन्वाचे नाव समोर आल्यानंतर या सर्व घटनेमुळे सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. सुधन्वाला शुक्रवारीच अटक करून त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यानेही बंदूक, पिस्टल असल्याची कबुली देऊन त्याने ठेवलेली ठिकाणे सांगितली. त्यानुसार घातक शस्त्रे जप्‍त केली असल्याचे एटीएस पोलिसांनी मुंबई येथे सांगितले आहे.

गेले पाच दिवस मुंबई एटीएस मुंबईसह पुणे, सोलापूर, औरंगाबाद येथे लक्ष ठेवून छापासत्र टाकत होते. शुक्रवारी झालेल्या या सर्व प्रकारानंतर एटीएस पोलिस सातार्‍यात आले नव्हते; पण ते येण्याची अटकळ बांधली जात होती. त्यानुसारच एटीएसच्या पुढील कारवाईनुसार ते मंगळवारी उशिरा सातार्‍यात पथकासह दाखल झाले. सुधन्वा याचा कंरजे येथे बंगला असून त्याची पत्नी, वडील, आई याठिकाणी वास्तव्य करत आहेत. एटीएस पोलिसांनी सुधन्वाच्या या घरावर छापा टाकून पाहणी केली. यावेळी पोलिसांनी काही कागदपत्रे, वस्तू जप्‍त केले आहेत. यानंतर पोलिसांनी सुधन्वा याच्या कुटुंबियांकडेही चौकशीला सुरुवात केली.

दरम्यान, पुणे एटीएसचे पथक सातार्‍यातील करंजे येथे पोहचल्यानंतर त्याठिकाडी बघ्यांची गर्दी उसळली होती. सायंकाळी पाच वाजता कारवाईला सुरुवात झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरुच होती. यामुळे अधिक तपशील समजून आलेला नाही.